भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भरपावसात कार्यक्रम

पुणे : पुणे शहरातील नवी पेठेतील सेनादत्त पोलीस चौकी समोरील चौकाचे नामकरण आज सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सुरेश आप्पा माळवदकर असे करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण झाले. फलक अनावरणाचा कार्यक्रम सुरु होताच पावसाचेही आगमन झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू होते. पण त्यांनी न थांबता सुरेश आप्पा माळवदकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांच्या या भूमिकेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सचिव आणि पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघुनाथ गौडा, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: