प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे जनता कायमच उभी राहते – गिरीष बापट

पुणे : शहरात काम करणारे अनेक नगरसेवक आहेत परंतु अनिल टिंगरे यांनी महापालिकेत कसे काम करावे याचा आदर्श निर्माण केला आहे. प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून धानोरी प्रभागाचा कायापालट त्यांनी केला असून विकासाचे काम प्रामाणिकपणे करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मागे जनता कायमच उभी राहते असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. धानोरी प्रभागात उभारण्यात आलेल्या 25 लक्ष लिटर पाण्याच्या टाकीच्या व बी.जी.टी (बबन गबाजी टिंगरे) ई लर्निंग स्कूल उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

धानोरी मुंजाबावस्ती या भागात पूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या होती. अनिल टिंगरे यांनी सातत्याने पाठपुरा करून हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यासोबतच येथील मध्यमवर्गीयांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे यासाठी बीजीटी ई लर्निंग स्कूल उभी केल्यामुळे भविष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील असे महत्वपूर्ण विधायक काम नगरसेवक अनिल टिंगरे यांनी केले आहे. पुणे शहराचा खासदार म्हणून सर्व पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते यांचं योग्य कामासाठी मी कायमच त्यांच्या पाठीशी असल्याचे मत खासदार बापट यांनी व्यक्त केले. माणूस बोलत नाही त्याचे काम बोलते अशा शब्दात नगरसेवक अनिल टिंगरे यांनी धानोरी प्रभागात उभ्या केलेल्या विकासकामांचे त्यांनी कौतुक केले. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार जगदीश मुळीक, वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, रघुनाथ कुचिक, नगरसेवक नाना सांगडे, राहूल भंडारे नगरसेविका ऐश्वर्या जाधव, नितीन भुजबळ, संतोष (लाला) खांदवे, आनंद गोयल, भीमराव गलांडे, रमेश आढाव, मोहनराव शिंदे-सरकार, सुनिल खांदवे (मास्तर), राजेंद्र खांदवे, मनोज पिल्ले, धनंजय जाधव, बाबुराव टिंगरे, संतोष राजगुरु, संतोष टिंगरे, चंद्रकांत जंजीरे, बाळासाहेब टिंगरे, मनोज आगरवाल, धनंजय टिंगरे, लिंगू साखरे, शामा जाधव, तेजश्री पुरंदरे यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

अनिल टिंगरे म्हणाले, की पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून धानोरीतील मुंजाबावस्ती याठिकाणी शाळा विकसीत करण्यात आली आहे. शाळेस 100 फुटी डीपी रस्ता असून प्रशस्त अशा पार्किंगची देखील व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागास शाळा तात्काळ हस्तांतर करुन लवकरात लवकर पालिकेच्याच माध्यमातून शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी टिंगरे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: