Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री माधवी गोगटेे यांचे निधन

मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून रसिकांच्या मनावर राज्य करणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने मराठी कलाविश्‍वावर शोककळा पसरली आहे.

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. भ्रमाचा भोपळा, गेला माधव कुणीकडे ही त्यांची नाटके तुफान गाजली होती. या नाटकांप्रमाणेच घनचक्कर या चित्रपटातील त्यांची भुमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. विशेष म्हणजे त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. मिसेस तेेंडुलकर, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा ना था, एक सफर, बसेरा, कहीं तो होगा या हिंदी मालिकांत त्या झळकल्या होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading