पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार

पुणे : गेल्या आठवड्याभरापासून दक्षिण भारतात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. तर मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने बॅटींग सुरू केला आहे. रविवारी पुणे शहरात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व-मध्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येईल.  त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.  हवामान विभागाने मच्छिमारांना 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रवाह पाहता प्रादेशिक हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाजही जारी केला आहे.

21 व 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरला यलो अलर्ट 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 21 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 22 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: