जागतिक स्मरण दिनानिमित्त वाहतूक जनजागृती

पुणे : रस्ते अपघातात जगभरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरीकांना श्रद्धांजली म्हणून जगभर २१ नोव्हेबर हा दिवस जागतिक ‘स्मरणदीन’ म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने महेश ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली
कात्रज चौकात जनजागृतीपर भव्य रांगोळी काढून जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी संजीव भोर , संजय ससाणे, सहाय्यक परिवहन अधिकारी युवराज पाटील , मोटार वाहन निरीक्षक शाहिद जमादार, अमृता क्षीरसागर, जयवंत मोरे, आशिष पराशर, संतोष झगडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी रिक्षा चालक व अन्य वाहतूकदारांना योग्य ते मार्गदर्शन केले. आणि सीट बेल्ट व हेल्मेट घातलेल्या वाहनधारकांना गुलाबाचे फुल देण्यात आले. तसेच रास्ते अपघातात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गामाजी यांनी तर आभार प्रदर्शन शशांक शिळीमकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: