आगामी काळात सूज्ञ नागरिक नक्कीच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील – रमेश बागवे

पुणे : काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जातो. येरवडा वडगावशेरी हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात पुन्हा एकदा चांगली ताकद उभी केली आहे. आगामी काळात या भागातील सूज्ञ नागरिक नक्कीच काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील असा विश्‍वास पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला.

शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विल्सन चंदेवळ व शहर युवक काँग्रेस सरचिटणीस ज्योती चंदेवळ यांच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बांधकाम मजुरांना शासनाचे सुरक्षा किट वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विशाल मलके, कार्याध्यक्ष राहुल शिरसाट, मीना शिंदे, समीर शेख, रमेश सकट, सिरीयल आशीर्वादम यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सन 2015 पासून सुमारे दीड हजार पेक्षा अधिक गरीब व गरजू बांधकाम मजुरांना अंदाज सात कोटी रुपयांचे शासनाचे वैयक्तिक व शैक्षणिक अनुदान चंदेवळ दाम्पत्यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तीस वर्षापासूनचा पर्णकुटी पायथा येथील रखडलेला ड्रेनेज वाहिन्यांचा गंभीर प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावलेला आहे. त्यामुळे सत्तेत नसताना देखील पक्षाच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या हिताची कामे केली आहेत. त्यामुळे आगामी काळात येरवडा परिसरातून काँग्रेस पक्षाला नक्कीच संधी मिळेल. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: