मराठी कलाकारांची गोवा लघुपट महोत्सवात चमक

पुणे : लघुपटांच्या माध्यमातून विविध विषय प्रभावीपणे मांडून अनेक मराठी कलाकारांनी गोवा महोत्सवामध्ये आपली चमक दाखवली. सर्वोत्कृष्ट लघुपटासह विविध विभागात मराठी कलाकारांनी पारितोषिके पटकावले. लॉलीपॉप हा मराठी लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला.

मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित आठव्या गोवा लघुपट महोत्सवात (Goa Short Film Festival) प्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी कांबळे, ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव, ज्येष्ठ छायाचित्रकार राम झोंड, लेखक भालचंद्र सुपेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

खानाबदोश या लघुपटाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रण सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट प्रथम दिग्दर्शनाचे पारितोषिके मिळाले. गजरा या लघुपटासाठी विनीत शर्मा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले तर हाच लघुपट सर्वोत्कृष्ट न्यारेटिव्ह लघुपट म्हणून गौरविण्यात आले. सुदेशना गोस्वामी यांचा सम बर्ड्स कांत फ्लाय माहितीपट सर्वोत्कृष्ट ठरला. प्रणव वाणी यांचा वायली या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचे पारितोषिक मिळाले. तर विराज झुंजारराव यांचा साइड मिरर हा मराठी लघुपट सर्वोत्कृष्ट इंडियन लघुपट म्हणून गौरविण्यात आले. देवल्या होले यांना लॉलीपॉप या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचे पारितोषिक मिळाले

Leave a Reply

%d bloggers like this: