अनिल देशमुख प्रकरणात पवारांना स्वतःची काळजी आहे का? किरीट सोमय्या यांचा पवारांना सवाल
पिंपरी: माजी गृह मंत्री अनिल देशमुख हे ईडी घोटाळ्यांमध्ये सापडले आहेत शरद पवार हेमाजी गृहमंत्री अनिल देशमुख याची पाठराखण करत आहेत. त्यावर शरद पवार यांचे अनिल देशमुख यांच्यावर इतके प्रेम का आहे? पवारांना स्वतःची काळजी आहे का? अनिल देशमुखांची असा प्रश्न भाजपचे नेते व खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरीतील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेला पिंपरी चिंचवड मधील भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. आज किरीट सोमय्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांनी परत किती साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत याचा पर्दाफाश केला.
किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर जरंडेश्वर साखर कारखान्यात त्यांचा हिस्सा असल्यामुळे ईडी ने छापे टाकले आहेत. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवार यांच्या बहिणी च्या नावावर बनावट मालमत्ता आहेत. त्यामुळे ईडी ने कारवाई केली आहे असे किरीट सोमय्या म्हणाले.
जालना साखर कारखान्यात घोटाळा झाला आहे त्यावर किरीट सोमय्या म्हणाले अर्जुन खोतकर जालना साखर कारखान्याचे पहिले भागीदार आहेत, जालना साखर कारखान्याचे दुसरे भागीदार हे रुपाली विश्वास पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस चे ज्वाइंट कमिशनर आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे. असे किरीट सोमय्या म्हणाले.
संजय राऊत यांनी पण घोटाळा केला अशी मध्ये चर्चा होती त्यावर सोमय्या म्हणाले ,संजय राऊत यांनी बेनामी 55 लाख परत करून ईडी ची माफी मागितली. तापडिया इंडस्ट्रीने अर्जुन खोतकर यांना साखर कारखाना घेण्यासाठी पैसे दिले असा आरोप किरीट सोमय्यांनी तापडिया इंडस्ट्री वर केला.
