उशिरा का होईना पंतप्रधानांना शहाणपण सूचले – रमेश बागवे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शेतकऱ्यांचे ३ काळे कृषी कायदे रद्द केल्याबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

गेल्या वर्षी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात ३ कृषी कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पध्दतीने मंजूर करून घेतले.‌ काँग्रेस पक्षाने सुरूवातीपासूनच या ३ काळ्या कृषी कायद्याला विरोध केला होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चे दरम्यान काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेवून लढा दिला. पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देवून या आंदोलनाला यशस्वी केले. विरोधकांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना ३ काळे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली होती परंतु पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज सकाळी पंतप्रधान देशाला संबोधित करताना म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने जो कृषी कायदा अमंलात आणला होता तो कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द करीत आहे.’’ पंतप्रधानांना उशिरा का होईना शहाणपण सुचले. पंजाब व उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला. पंजाब व उत्तर प्रदेशचे शेतकरी कृषी कायद्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते हे पंतप्रधानांना माहित होते. आज गुरूनानक यांची जयंती असल्यामुळे पंतप्रधानांनी हा निर्णय घेवून पुन्हा या लोकांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पंतप्रधानांनी आंदोलनजीवी म्हणून संबोधित केले होते. आज त्याच आंदोलनजीवींकडे माफी मागवी लागली ही शोकांतिका आहे. कडाक्याची थंडी, ऊन, पाऊस मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अनेक शेतकऱ्यांच्या कुटूबांना त्रास झाला. या आंदोलनामध्ये जवळपास ६०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला याला जबाबदार कोण? याचे उत्तर पंतप्रधांनी द्यावे. भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिकेचा आज पर्दाफाश झाला आहे.

येत्या निवडणुकीमध्ये देशाची जनता भारतीय जनता पक्षाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या एकीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकारला हा कायदा रद्द करावा लागला. मी शेतकऱ्यांचे आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे अभिनंदन करतो.

यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, वाल्मिक जगताप, राजेंद्र पडवळ, सुनिल दैठणकर, प्रशांत सुरसे, यासीन शेख, शिलार रतनगिरी, सुरेश कांबळे, सौरभ अमराळे, परवेज तांबोळी, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, राजू नाणेकर, मीरा शिंदे, रणजित गायकवाड, राहुल तायडे, नितीन परतानी, चेतन आगवाल, फैय्याज शेख, दत्ता जाधव, रोहित धेंडे, रजनी त्रिभुवन, दुर्गा शुक्रे, प्राची दुधाने, संगिता क्षिरसागर, विश्वास दिघे, ज्योती परदेशी, विठ्ठल गायकवाड, अक्षय माने, हनुमंत पवार, विक्रम खन्ना, आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: