fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन

पुणे : भारतरताच्या माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. इंदीराजी गांधी यांच्या १०४ वी जयंती निमित्त आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस माजी आमदार उल्हास पवार व बाळासाहेब शिवरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उल्हास पवार म्हणाले की, ‘‘स्व. इंदिराजी गांधी यांच्या दूरदृष्टीकोनामुळे देशाची प्रगती झाली आहे. त्यांनी बँकेचे राष्ट्रीयकरण करून सामान्य जनतेला आपल्या व्यवसायासाठी कर्ज मिळवून दिले. २० कलमी कार्यक्रमाद्वारे गोरगरीब जनतेचा फायदा झाला. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे १९७१ साली झालेल्या युध्दात पाकिस्तान विरोधात भारताला विजय मिळाला आणि आणि बांग्ला देशाची निर्मिती झाली. १६ डिसेंबर २०२१ ला या युध्दाचा सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहोत. इंदिराजींनी समाजातील सर्व घटकांना समाविष्ट करून घेऊन देशाचे नेतृत्व केले परंतु आज मोदी सरकारच्या राजवटीत धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण करून देशाच्या एकोप्याला नष्ट करण्याचे काम चालू आहे. आजच्या युवा पिढीने इंदिराजींनी देशासाठी केलेल्या कार्याची प्रेरणा घेवून आपली भावी वाटचाल करावी. मी त्यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे हे होते.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, वाल्मिक जगताप, राजेंद्र पडवळ, सुनिल दैठणकर, प्रशांत सुरसे, प्रकाश पवार, यासीन शेख, शिलार रतनगिरी, सुरेश कांबळे, भगवान कडू, मिलिंद अहिरे, सौरभ अमराळे, परवेज तांबोळी, गणेश शेडगे, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, राजू नाणेकर, अकबर शेख, मीरा शिंदे, रणजित गायकवाड, राहुल तायडे, नितीन परतानी, चेतन आगवाल, फैय्याज शेख, दत्ता जाधव, रोहित धेंडे, नलिनी दोरगे, रजनी त्रिभुवन, दुर्गा शुक्रे, प्राची दुधाने, सुंदर ओव्हाळ, संगिता क्षिरसागर, स्वाती शिंदे, विश्वास दिघे, ज्योती परदेशी, विठ्ठल गायकवाड, अक्षय माने, हनुमंत पवार, विक्रम खन्ना, आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूचसंचालन माजी महापौर कमल व्यवहारे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading