fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

 दिव्यांच्या प्रकाशात उजळले पेशवेकालीन शिवमंदिर

पुणे: श्री शिवाय नमस्तुभ्यंचा मंत्र उच्चार, रांगोळीच्या पायघड्या आणि दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर  उजळले … त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील तब्बल २०० हुन अधिक वर्षे जुन्या पेशवेकालीन शिव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

आधार सोशल फाउंडेशन व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेठेतील पेशवेकालीन शिव मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, मोतीबाग नगर संघचालक ऍड. शरद चंद्रचूड, मोतीबाग नगर सहसंघचालक ऍड. प्रमोद बेंद्रे, धर्म मठमंदिर संपर्कप्रमुख राजेंद्र कुलकर्णी, आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे, उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष सविता काळोखे, यशोधन आखाडे, राजेंद्र शिंदे, अनिल काळोखे, पूरण हुडके, अनिल पवार, बंडू गुजर, विठ्ठल बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी ५०० हून अधिक दिव्यांनी मंदिराची सजावट करण्यात आली. याचबरोबर तोरण रांगोळीच्या पायघड्यांनी मंदिर सजवण्यात आले होते.

स्वरदा बापट म्हणाल्या, कोरोना काळात अनेक बंधने आल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करता आले नाहीत. परंतु आता हळूहळू बंधने शिथिल होत आहेत. तरीदेखील आपण काळजी घेतली पाहिजे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, त्यामुळे नियमांचे पालन करून आरोग्य जपणे देखील गरजेचे आहे, असे ही त्यांनी सांगितले.

ऍड शरद चंद्रचूड म्हणाले, हिंदू धर्माला मोठी परंपरा लाभली आहे. आपण सण उत्सव साजरा करतो त्यामागे धार्मिक बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे. आपण आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी धर्माप्रमाणे वर्तणूक केली पाहिजे. जुन्या पिढीचे काम हे नव्या पिढीवर संस्कार घडविण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

दिलीप काळोखे म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घराघरात मंदिरात व इतर ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. पुण्यात अनेक ठिकाणी पेशवेकालीन, शिवकालीन जुनी मंदिरे आहेत. आपल्याला मिळालेला हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अशा जुन्या वास्तूत सण साजरे केले पाहिजेत. हा उद्देश समोर ठेवून आधार सोशल फाउंडेशन च्या वतीने मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. प्रमोद बेंद्रे, राजेंद्र कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल काळोखे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading