किरण गोसावीच्या महिला साथीदाराला लष्कर पोलिसांकडून अटक

पुणे : क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणातील कथित एनसीबी अधिकारी म्हवणारा किरण गोसावी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल पिंपरी- चिंचवड येथे नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला असतानाच, दुसरीकडं या फसवणूक प्रकरणात त्याची साथीदार असलेल्या कुसुम गायकवाडला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे.

कुसुम गायकवाड दुबईहून परत येताच लष्कर पोलिसांनी तिला अटक केली. किरण गोसावीची सहकारी असलेल्या कुसुम यांच्यावरही शिवराज जामदार या तरुणांकडून 1 लाख 30 हजार रुपये घेतले आल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या कुसुम यांच्याकडून महत्त्वाचाही माहिती समोर येणाची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लष्कर पोलिसांनी यापूर्वीही गोसावीची महिला साथीदार शेरबानो कुरेशीलाही अटक केली आहे.

गोसावीवर फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल

किरण गोसावीवर नोकरीचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे पुण्यात चार , पिंपरी चिंचवडमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे. राज्याच्या इतर भागातून पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यातील फरासखाना पोलीस स्थानकात तीन वर्षांपूर्वी गोसावीवर फसवणुकीचा पहिला गुन्हा नोंद झाला होता. ज्या ज्या नागरिकांची किरण गोसावीने फसवणूक केली आहे त्यांनी न घाबरता पुढे  येऊन तक्रारी दाखल करव्यात असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: