लसीकरणास नागरिकांनी प्रतिसाद कमी ; लसीकरण केंद्रांवरील सरासरी ५० टक्के डोस शिल्लक

पुणे : पुणे महापालिकेकडे सध्या कोव्हिशिल्ड ६० हजार डोस शिल्लक आहेत, शहरात सुमारे १८७ केंद्रांवर रोज २५० डोस पुरविले जात आहेत. दरम्यान, सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरात पहिल्या डोसचे लसीकरण मोठ्याप्रमाणात झाले आहे. आहेत. शहरात ३० लाख नागरिकांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट होते, ते उद्दिष्ट महापालिकेने या आधीच पूर्ण केले आहे. त्यामुळे आता पहिल्या डोससाठी लसीची मागणी कमी झाली आहे. दुसऱ्या डोससाठी अनेक नागरिक प्रतिक्षेत आहेत, पण कोव्हीशील्डचा दुसरा डोस ८४ दिवसानंतरच घेता येतो, त्यामुळे लस उपलब्ध असून देखील नागरिकांना तिचा लाभ घेता येत नसल्याची स्थिती आहे.

डॉक्टर देवकर म्हणाले,दर महिन्यात लसीचा पहिला डोस घेतलेल्या बहुतांश नागरिकांचे दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण डिसेंबरमध्ये सुरू होईल. त्यावेळी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील संख्या वाढेल. सध्या शहरात पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७२ टक्के आहे. ती पुढील महिन्यात ९० टक्क्यापर्यंत जाईल.

शहरातील १०० टक्के नागरिकांचा कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस पूर्ण झाल्याने व दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांनी बंधन असल्याने लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद कमी झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील सरासरी ५० टक्के लस शिल्लक राहात असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: