महापालिकाने पुन्हा अतिक्रमणांवर कारवाई केल्यास पथारि व्यवसाय पंचायतीचा आंदोलनाचा इशारा

पुणे : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले पथारी व्यावसायिक पुन्हा व्यवसायासाठी सरसावले आहेत. दिवाळीत पुणे महापालिकेने अतिक्रमण कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पथारी व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला झाला. आता दिवाळी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा अतिक्रमणांकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, महापालिकाने पुन्हा अतिक्रमणांवर कारवाई केल्यास पथारि व्यवसाय पंचायतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पथारी व्यवसाय पंचायतीचे सचिव बाळासाहेब मोरे म्हणाले, ”जे अनधिकृतपणे व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास काही हरकत नाही. मात्र यानिमित्ताने पुनर्वसनाचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर येत आहे. महापालिकेने अनेक व्यावसायिकांचे पुनर्वसन केलेले नाही, प्रमाणपत्र दिलेले आहे पण त्यांना रोज वेगळ्या ठिकाणी बसायला भाग पाडले जात आहे. महापालिकेने कडून अन्यायकारक कारवाई केल्यास त्या विरोधात आंदोलन केले जाईल.

दरम्यान, महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील २० हजार पथारी व्यावसायिकांचे कोरोना काळातील भाडे व दंड माफ केल्यानंतर आता अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी दंडुका उचलण्याची निश्चित केले आहे. १५ कार्यालयाच्या हद्दीत सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत पूर्वसूचना न देता अचानक कारवाई केली जाणार आहे.यासाठी अतिक्रमण विभागाने नियोजन सुरू केले आहे.

अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले, “प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये आठवड्यातून एक दिवस मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे. या वेळी तेथील सहाय्यक आयुक्त उपस्थित राहतील तसेच कोणत्या भागात कारवाई होणार आहे याची पूर्व कल्पना दिली जाणार नाही. अचानक कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे. ”

 

Leave a Reply

%d bloggers like this: