महागाई विरोधात कॉँग्रेसचे 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी जनजागर अभियान

पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान राज्यभर जनजागर अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत कोंग्रेस पक्षातील जेष्ठ नेते तसेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे पुणे प्रभारी संजय राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला पुणे शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे, आमदार दिप्ती चौधरी, माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.

संजय राठोड म्हणाले, काँग्रेस पक्षाचा एकच उद्देश आहे की केंद्र सरकारने महागाई कमी करावी.
आम्ही प्रत्येक गावात एक वार्ड तयार करणार असून. त्यानुसार आम्ही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. त्यामध्ये केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई चे महत्त्व नागरिकाना पटवुन देणार आहेत. यामध्ये आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते हे 14 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील खेडे गावात मुक्काम करणार असून नागरिकांशी संवाद साधतील.

 

Leave a Reply

%d bloggers like this: