मनसे चित्रपट सेनेच्या वतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’ स्पर्धेचे आयोजन

– कलाकारांच्या प्रश्नांसाठी भिडणारे पदाधिकारी आता भिडणार क्रिकेट च्या मैदानात !

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्यावतीने ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’चे या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या सिनेविंगच्या संघासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व पत्रकारांच्या संघाचा देखील संघाचा समावेश असणार आहे. त्यामुळे एरवी कलाकारांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळे भिडणारे पदाधिकारी आता  क्रिकेट च्या मैदानात भिडताना दिसणार आहेत, अशी माहिती मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अभिनेते रमेश परदेशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी  मेघराज राजेभोसले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), ॲड मंदार जोशी (राष्ट्रीय निमंत्रक-आर. पी. आय), बाबा पाटील (राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग),अजय नाईक (भाजपा चित्रपट आघाडी), रोहन शेट्टी (भाजपा चित्रपट आघाडी), अमृता मिश्रा(भाजपा चित्रपट आघाडी),सुशील सर्वगौड (आर पी आय,चित्रपट आघाडी), अभिजीत जाधव (अ.भा.कॉंग्रेस), कौस्तुभ कुलकर्णी (शिवसेना चित्रपट सेना), विनोद सातव (मीडिया) उपस्थित होते.

रमेश परदेशी म्हणाले, एरवी हे विविध पक्षाचे सिनेविंगचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलाकार एकमेकांसोबत भांडत असतात व कलाकारांचे प्रश्न मांडण्याचा ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या सर्वांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 14 नोव्हेंबर 2021 रोजी पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी जवळच्या ग्राउंडवर सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. ही क्रिकेट स्पर्धा एकदिवसीय असणार आहे. ‘मैत्री बॉक्स क्रिकेट लीग-२०२१’मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, भाजपा चित्रपट आघाडी, आर पी आय,चित्रपट आघाडी, कॉंग्रेस, शिवसेना चित्रपट सेना, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग आदी पक्षांच्या सिनेविंगचा तसेच पत्रकारांच्या एका टीमचा  या क्रिकेट स्पर्धेत सहभाग आहे, असेही परदेशी यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: