सिव्हिल इंजिनिअर आशिष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जैन संघटना विद्यालयास संगणक भेट

पिंपरी : मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार यांचे चिरंजीव आशिष पवार यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून पिंपरी येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाला संगणक संच भेट देण्यात आला.

भारतीय जैन संघटना विद्यालयात सर्वसामान्य, गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात. अशा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी विद्यालय नेहमी प्रयत्नशील असते. विद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तांत्रिक सुविधांचा लाभ व्हावा, या दृष्टीने ही मदत करण्यात आल्याचे आशिष पवार यांनी यावेळी सांगितले.

ही मदत मिळविण्यासाठी प्रा. संपत गर्जे, गजानन वाढे, दिलीप सुर्वे यांनी विशेष प्रयत्न केले. याप्रसंगी प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य राजेंद्र कोकणे, प्रा. संपत गर्जे, अरुण पवार, गजानन वाढे, प्रा. दिलीप सुर्वे, वामन भरगांडे, सामाजिक कार्यकर्ते उमेशजी कुंदे, ब्रम्हदेव दास, नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अखिल भारतीय वारकरी महामंडळाला ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या शंभर हस्तलिखित प्रतींसाठी आर्थिक मदतीचा धनादेश महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप पाटील यांच्याकडे ह.भ.प. दत्ताजी चिंचवडे, ह.भ.प. अप्पासाहेब बागल, वृक्षमित्र अरुण पवार, आशिष पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अप्पा बागल, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे संपर्क प्रमुख किशोर पाटील, भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दत्ताभाऊ चिंचवडे, माऊली महाराज आढाव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: