अभिनेता आर्यन हगवणेचे ‘खुर्ची’ चित्रपटद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण

‘आला आला आला आला खुर्चीचा राजा आला’ अशी टॅगलाईन म्हणत ‘खुर्ची’ सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रकाशित झाले. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.अभिनेता आर्यन हगवणे या चित्रपटातून सृष्टीत पदार्पण करीत असून तो यामध्ये राजवीर राजाराम देसाई या नावाची भूमिका साकारणार आहे.
‘ऍक्ट प्लॅनेट ऍकटिंग’ अकॅडमी आणि जवळच्या भरपूर व्यक्तींकडून आर्यनने अभिनयाचे धडे घेत त्याने अभिनयाची आवड जोपासली.  वयाच्या पाचव्या वर्षांपासून फॅशन मॉडलिंग क्षेत्रात पदार्पण करून त्यानंतर आर्यनने अभिनयक्षेत्रात बरीच पारितोषिक पटकवली. विशेष म्हणजे आर्यनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाच्या टिझर नंतर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना आर्यन म्हणाला की, “खुर्ची हा माझा पहिलाच चित्रपट असून ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली. बरेच काही शिकायला मिळाले’.
‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट सहनिर्माता सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर आणि अमित बैरागी  यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.  या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष वसंत हगवणे यांची असून दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील अँड ऍक्ट प्लॅनेट यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रितम एस के पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली.

Leave a Reply

%d bloggers like this: