लस घेऊया… आरोग्यमय दिवाळी साजरी करुया

पुणे : भारतीयांचे १०० कोटी डोस पूर्ण… अभिनंदन… लस घेऊया… आरोग्यमय दिवाळी साजरी करुया… असा संदेश देत न-हे येथील कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशनतर्फे १० बाय २० फूट आकारातील भव्य रंगावली साकारण्यात आली. दिवाळीच्यानिमित्ताने दीपोत्सव करुन अंधारातून प्रकाशाकडे व कोविडच्या संकटाकडून आरोग्यसंपन्नतेकडे जाण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला.

फाऊंडेशनच्या सुरेखा जाधवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली साकारली. तब्बल २ तास ही रंगावली साकारण्याकरीता लागले. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी उपक्रमाकरीता मार्गदर्शन केले.

सुरेखा जाधवर म्हणाल्या, रंगावली आणि दीपोत्सवाच्या माध्यमातून सणांचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविण्याकरीता दरवर्षी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या संस्कृतीतील शुभ चिन्हे रंगावलीच्या माध्यमातून साकारुन हा उत्सव अधिक मंगलमय करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाची दिवाळी आरोग्यमय दिवाळी व्हावी, याकरीता लसीकरणाचा संदेश देण्यात आला आहे. नागरिकांनी मोठया संख्येने लसीकरण करुन कोविडसारख्या संकटाला दूर ठेवण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: