Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

दिलासादायक : पुणे  शहरामध्ये आज पुन्हा एकदा एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही

 पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या शंभरहून ही कमी आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 71 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आज पुन्हा पुणे शहरामध्ये एका ही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 42 हजार 286इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 94हजार 481इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका हद्दीबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 731रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 112रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5239
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading