कातकरी वस्तींवर दिवाळीचा आनंद; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार

पुणे : कोरोनाचे सावट आजही समाजावर दाटलेले आहे. त्यात कष्टकरी समाजाची अवस्था अधिकच बिकट आहे. टेमघर धरण परिसरातील आंदगाव ,लव्हार्डे ,भोडे गावातील कातकरी वस्तीही याला अपवाद नाही. जीथे कोरोनामुळे हातालाच  काम नाही तिथे दिवाळी कशी साजरी करणार. या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांनी एकत्र येत कातकरी वस्त्यांवर दिवाळी साजरी केली.
पुण्यातील बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट,  येरवड्यातील नवज्योत मित्र मंडळ, गुरुवार पेठेतील वीर शिवराज मित्र मंडळ आदी मंडळांनी आंदगाव ,लव्हार्डे ,भोडे  ह्या तीन गावातील कातकरी समाजाची दिवाळी प्रकाशमान केली. यावेळी पियुष शहा ,किरण सोनिवाल ,अमित जाधव ,चैतन्य सिन्नरकर ,मोहित झंजले  व कातकरी वस्तीचे रवी जाधव व नांदेड सिटी मैत्री कट्टा सभासद उपस्थित होते.
 उपक्रमांतर्गत या कातकरी बांधवांना आकाश कंदील,  व चकली ,शंकरपाळी ,चिवडा ,शेव, लाडू व फरसाण असे विविध फराळाचे पदार्थ साधारण ८० कुटुंबाना देऊन त्यांची दिवाळी आनंदित केली.
पीयुष शाह म्हणाले,  दिवाळीचे खरे आकर्षण मुलांना असते. वस्तीवरील मुलांना ध्वनिप्रदूषण विरहित असे फुलबाजा, अनार असे फटाके देण्यात आले. या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरा केल्याचे समाधान या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मिळाले.

Leave a Reply

%d bloggers like this: