महारपालिकेच्या निवडणूका एकत्र लढण्यावर आम्ही बैठक घेत आहोत – खासदार संजय राऊत

पुणे: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणूकित महाविकास आघाडी या निवडणूका एकत्र लढणार का यांची चर्चा सुरू आहे.त्यावर पुण्यातील महापालिकेच्या निवडणूका या एकत्र लढण्यावर आम्ही बैठक घेत आहोत. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यातिल पत्रकार परिषदेत या बद्दल माहिती दिली.

आगामी महानगरपालिका निवडणूकित हळूहळू सगळ्या पक्षानी तयारी चालु केली आहे.त्यावर शिवसेनेने पण तयारी चालू केली आहे . असे संजय राऊत म्हणाले.
समीर वानखेडे प्रकरणावर पण त्यांनी भाष्य केले
सध्या सुरू असलेली लढाई क्रांती रेडकर विरोधात व्यक्तिगत लढाई नाही .
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित बहिनीच्या घरी कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून  छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. त्यावर संजय राऊत म्हणाले,अजित पवारांच्या बहिणी,वाशिमच्या खासदार भावना गवळी मराठी नाहीत का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. येणाऱ्या 2024 साली निवडणुकीमध्ये मध्ये दिल्लीतील चित्र पूर्णपणे बदललेलं असेल . असेही संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: