Aryan Khan – अखेर २६ दिवसांनी आर्यन खानची जेल मधून सुटका

मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणात गेल्या २६ दिवसांपासून तुरुंगात असलेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा  आर्यन खानची अखेर जेल मधून सुटका झाली  आहे. त्याला गुरुवारी जामीन मंजूर झाला होता. मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्याला बाहेर पडण्यात वेळ लागला.

क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खान सह आठ जणांना एनसीबी ने अटक केली होती. या प्रकरणावरून सध्या बरेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच त्याचा जामीन अर्ज स्विकरण्यासही उशीर झाला. अखेर २६ दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला आहे. गुरुवारी त्याला जामीन मिळाला आणि आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनासाठी जामीनदार म्हणून सेशन कोर्टात पोहोचली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात दाखल झाले होते. मानेशिंदे यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. यावेळी जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली.

कोर्टात जुही चावलानं आपलं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर केलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. मात्र यावेळी जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडला. त्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला.

दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला.आता आर्यनसही तिघांची जामिनीवर सुटका होणार आहे. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे. एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये,  मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: