‘नवरंग रुपेरी’ दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न!!

‘नवरंग रुपेरी’ या करमणूक जगतास वाहिलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (National Film Archive of India) ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि संशोधक आरती कारखानीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. हिंदी/मराठी चित्रपट, रंगभूमी, टेलिव्हिजन व आता नव्याने आलेल्या ओटीटी  अशा करमणूक जगताच्या विविध माध्यमांना समर्पित व १९८७ सालापासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या या अंकाचे हे ३५ वे वर्ष होय.

‘नवरंग रुपेरी’ चे निवासी संपादक व ज्येष्ठ सिनेअभ्यासक धनंजय कुलकर्णी, पुणे येथील ज्येष्ठ वास्तुविशारद विश्वास कुलकर्णी व ज्येष्ठ सिनेअभ्यासक व लेखक कृपाशंकर शर्मा यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. नवरंग रुपेरी तर्फे धनंजय कुलकर्णी यांनी आरती कारखानीस यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   

“चित्रपटांचा समृद्ध इतिहास जतन होण्यासाठी आणि तो पुढच्या पिढ्यां पर्यंत पोचविण्यासाठी चित्रपट विषयक दिवाळी अंकाचा मोठा उपयोग होतो. असे दिवाळी अंक आपला सिनेमाचा सांस्कृतिक वारसा पुढे नेत असतात. नवरंग रुपेरी दिवाळी अंक गेल्या ३५ वर्षपासून मोठ्या निष्ठेने ही जवाबदारी पार पाडत आहे. भारतीय सिनेमाच्या अभ्यासकाना नवरंग रुपेरी हा दिवाळी अंक आणि त्यांची वेबसाईट खूप उपयुक्त आहे” असे विचार चित्रपट अभ्यासक आणि संशोधक आरती कारखानीस यांनी व्यक्त केले. निवासी संपादक धनंजय कुलकर्णी यांनी अंकाचे अंतरंग उलगडून सांगितले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या ग्रंथालयात साजऱ्या झालेल्या या सोहळ्याला संचालक प्रकाश मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या.

जेष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर या अंकाचे संस्थापक संपादक आहेत. अजिंक्य अशोक उजळंबकर अंकाचे कार्यकारी संपादक आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार नूतन उर्सेकर यांनी व्यक्त केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: