Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

गिर्यारोहण क्षेत्रात महिलांनी यावे – उष:प्रभा पागे

पुणे : महिला सर्वच विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत .त्याचप्रमाणे गिर्यारोहण क्षेत्रात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्टातील पहिल्या ट्रेकिंग वरील दुर्गांच्या देशातून या गड किल्ल्याविषयी च्या विशेष पुस्तकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांनी केले.

ज्येष्ठ गिर्यारोहक प्रा.प्र.के.घाणेकर आपल्या मनोगतात म्हणाले की ,महिलांनी उंभरठा ओलांडून आपल्या कला आणि आवड जोपासली पाहिजे यावेळी अतिशय लहान वयात मोठी कामगिरी करणारी गिरिजा हीचे कौतुक केले
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. लता वाडेकर म्हणाल्या की ,आजच्या शिक्षणपद्धतीत गड ,किल्ले आणि गिर्यारोहण या विषयी अधिक माहिती व ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. वयाच्या नवव्या वर्षी गिरिजा लांडगे हिने लिगांना व अतिशय दुर्गम आणि अवघड केलेले ट्रेक च्या विषयी आठवणी व अनुभव व्यक्त केले.
सुप्रिया चक्रवर्ती यांनी एवरेस्ट शिखर मोहिमेतील अडचणी ,त्रुटी ,आणि अनेक चित्तथरारक आठवणी यावेळी सांगितल्या .
दुर्गांच्या देशात या पुस्तकात महाराष्टातील विविध भागातील महिलांनी केलेल्या ट्रेकिंग विषयाचे अनुभव आणि मार्गदर्शन यामध्ये सविस्तरपणे लिहिले आहे.या मध्ये 25 ते 30 महिलानी केलेल्या ट्रेकिंग मधील आठवणी व अनुभव सविस्तरपणे विषद करून सांगितले आहेत .यामध्ये अतिशय कमी 9 वर्षाच्या वयात गिर्यारोहण करणारी गिरिजा लांडगे ,सुषमा कट्टी ,सुप्रिया चक्रवर्ती ,सुप्रिया साठे ,ज्योती राक्षे,राजश्री कसबे ,स्नेहल घेरडे ,मोनिका गोळे,अंजली कात्रे यासह अनेक महिलांच्या अनुभव आणि नव्या गिर्यारोहकांना मार्गदर्शन ठरणारे दुर्गांच्या देशातून हे पुस्तक आहे .दीपावली निमित्त महाराष्ट्र मधील गड,किल्ले, व गिर्यारोहण क्षेत्रात असणाऱ्या साठी खूपच मार्गदर्शक आणि ऐतिहासिक असा ठेवा ठरणार आहे.या कार्यक्रमात प्रत्येक गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. दुर्गांच्या देशातून याचे संपादन संदीप तापकीर आणि योगेश काळजे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading