जनशक्ती संघटना महिला आघाडीच्या नवी मुंबई प्रमुख पदी विनिता बर्फे यांची नियुक्ती

मुंबई:शेतकरी व ऊस वाहतूकदार यांच्या न्याय हक्कासाठी विविध आंदोलनातून नावारूपास आलेल्या अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वात जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्याच्या नवी मुंबई प्रमुखपदी विनिता भानुदास बर्फे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवी मुंबई उपनगरांमध्ये महिला सबलीकरण व सक्षमीकरण करणार संघटनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून दोनशे शाखांची बांधणी करून उपेक्षित व अन्यायग्रस्त महिलांना संघटित करून संघर्ष लढा उभा करण्याचा मनोबल संघटनेचा असून ते कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वनिता बर्फी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे यामध्ये शाखा बांधणी करणे, महिलांच्या आरोग्य विषयी विविध आजारांवर विविध शिबिरे आयोजित करून महिलांना मार्गदर्शन करून उपाय योजना उपलब्ध करून देणे, कौटुंबिक अत्याचारातून अन्यायग्रस्त महिलांना त्यांच्या भविष्यातील न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठबळ उभा करणे, महिलांचे बेरोजगारी आणि शैक्षणिक बाबींवर देखील अभ्यासपूर्ण नियोजन करून न्याय मिळून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे या कार्यात नवी मुंबई उपनगरातील महिलांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे यासाठी संघटनेच्या धोरणाची जनजागृती करून आणि कार्यशाळा आयोजित करून महिलांना संघटनेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशा विविध बाबीवर चर्चा करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते यांची नवी मुंबई उपनगरी प्रमुख पदी नियुक्ती करण्याचे मान्य होऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
    नियुक्ती पत्र देताना संघटनेचे प्रदेश महासचिव  रऊफ एन पटेल, औरंगाबाद युवा जिल्हा अध्यक्ष संतोष कोळगे पाटील, प्रधान कार्याध्यक्ष बंडूभाऊ बोबडे, पैठण युवा तालुकाध्यक्ष गणेश भोकरे, रुग्णसेवक गणेश बोबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

%d bloggers like this: