Thursday, May 14, 2026
BusinessLatest News

शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्यासाठी सोनालिका तर्फे शेतक-यांना मार्गदर्शन

पुणे : शेती उपक्रमांमधून फायदा मिळविण्यासाठी शेतक-यांना नवनव्या आणि प्रगत शेतीपद्धती शिकून घेणे शक्य व्हावे यासाठी सोनालिका ग्रुप विविध कृषीक्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत असतो. भारताचा पहिल्या क्रमांकाचा ट्रॅक्टर ब्रॅण्ड असलेल्या आणि ट्रॅक्टर निर्यातीच्या क्षेत्रात देशामध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने अलीकडे आपल्या किसान बैठकांच्या माध्यमातून शेतकरीवर्गाचा अधिक चांगले आयुष्य जगता यावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याप्रती आपल्या उल्लेखनीय कटिबद्धतेचे दर्शन घडविले. किसान बैठकांच्या माध्यमातून शेतक-यांमध्ये नव्या शिक्षण पद्धतींचा प्रसार करणे आणि शेतीची उत्पादकता तसेच उत्पन्न वाढविण्यासाठीच्या कमी खर्चिक पद्धतींविषयी त्यांना शिक्षित करणे हे सोनालिकाचे लक्ष्य आहे.

अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या किसान बैठकांमध्ये शेतक-यांना शाश्वत शेतीपद्धती स्वीकारण्याविषयी जागरुक करण्यासाठी कृषी-क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनाही आमंत्रित करण्यात आले होते. सर्वोत्तम परिणामांसाठी बियाणे निवडीविषयीचे ज्ञान देण्याबरोबरच त्यातून उत्पादकतेमध्ये भर पडावी या हेतूने सोनालिकाने सहभागी शेतक-यांना उत्तम जातीच्या बियाण्यांचे वाटपही केले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकूण १४ बैठकांमध्ये ५०० हून अधिक शेतकरी सहभागी झाले. यावेळी शेतक-यांना सेंद्रीय शेती, किटकनाशकांचा वापर नियंत्रित पद्धतीने कसा करावा, अधिक पिक मिळण्यासाठीच्य पद्धती, सिंचनाच्या योग्य पद्धती, शेतीसुधार अशा अनेक विषयांवरील आपले ज्ञान वृद्धिंगत करता आले.

सोनालिका सीएसआर विभागाच्या संचालक सुरभी मित्तल म्हणाल्या की शेतकरी आपला बहुतांश वेळ शेतीशी निगडित कामांमध्येच व्यतीत करत असतात मात्र उत्पादकतेच्या बाबतीत मात्र अनेक कारणांमुळे मागे पडतात – प्रगत तंत्रज्ञानाने सिद्ध ट्रॅक्टर्स, साधने वापरण्याविषयीच्या ज्ञानाचा अभाव तसेच उच्च दर्जाची बियाणी सातत्याने हाती न पडणे ही त्यापैकी काही कारणे आहेत. किसान बैठक उपक्रमांच्या माध्यमातून सोनालिकाने शेतक-यांना शेतीच्या अत्याधुनिक पद्धतींविषयीचे ज्ञान देण्याची शपथ वाहिली आहे. शेतक-यांना सुयोग्य प्रशिक्षण दिल्याने त्यांना भविष्यकाळात शाश्वत शेतीपद्धती अंगिकारण्यास मदत मिळू शकेल.त्यातून शेतकऱ्यांना अधिक चांगले पिक घेता येईल व आपल्या शेतकी उपक्रमांतून अधिक उत्पन्न मिळविता येईल. या बैठकांदरम्यान आम्ही आमच्या ‘सोनालिका ई-गुरुकुल’ अंतर्गत शेतक-यांच्या मुलांसाठी शिक्षणसत्रांचे आयोजनही केले. या मुलांनी उद्याचे जबाबदार नागरिक बनावे यासाठी त्यांना मदत करणे हा या शिक्षणसत्रांमागचा हेतू होता.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading