fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

भाजपासाठी सेवा हेच संघटन, विश्रांतीला परवानगी नाही -चंद्रकांत पाटील

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार सेवा हेच संघटन हा भारतीय जनता पार्टीसाठी मंत्र असून त्यानुसार सेवाकार्य करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही विश्रांती घेण्याची परवानगी नसते. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, हा माझा संकल्प असल्याची विनम्र भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील यांच्या ४५ वर्षांच्या समाजिक तथा राजकीय जीवनावर आधारीत चित्रचरीत्र (कॉपीटेबल बुक)चे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर,  खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, आमदार मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भीमराव आण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, धीरज घाटे,  पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, गणेश घोष, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर,  पुनित जोशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सेवा हेच संघटन’ मूलमंत्र घेऊन भाजपाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे सामाजिक तथा राजकीय जीवनात काम करत असताना, आपल्याला विश्रांती घेण्याची कधीही परवानगी नसते. त्यामुळे कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती! हा संकल्प अंगी बाणवून काम करायचे असते.”

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना मा. पाटील म्हणाले की, “योजना तयार करणे आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे हेच आपलं काम असलं पाहिजे. त्यावर निवडणुका सहज जिंकता येतात. कोविडमध्ये तुम्ही जे केले, ते लोक कधीही विसरणार नाही आहेत. त्यामुळे सेवेच्या माध्यमातून कोथरुड विधानसभा मतदारसंघामधून शंभर टक्के सर्व नगरसेवक भाजपाचे निवडून आले पाहिजेत. तसेच महापालिकेतील विजयानंतरही सेवा हा मंत्र मानूनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading