Sunday, May 3, 2026
Latest NewsPUNE

लोकायत नागरी समिती तर्फे रेशन आपल्या हक्काचं नावाने पुण्यातील विविध वस्तीत जनजागरण अभियान

पुणे:लोकायत नागरी समितीच्या वतीने वडारवाडी, महालेनगर भागात ’रेशन आपल्या हक्काचं’ नावानं रेशन विषयक जनजागृती अभियान आणि लोकांच्या तक्रारी घेण्याचे काम चालू होते. पोस्टर प्रदर्शन, पडद्यावर प्रदर्शन, नाटक, सभा, घरोघरी जाऊन अभियान अशा विविध माध्यमांतून हे अभियान राबवण्यात आले. अभियानादरम्यान लोकांच्या बर्याभच तक्रारी आल्या. लोकांचे रेशन विविध कारणांनी बंद पडले होते, काहींना कमी धान्य मिळत होते, अनेकांना खराब रेशन मिळत असल्याचे निदर्शनास आले.

अशा विविध तक्रारींचे अर्ज घेऊन दिनांक २६ ऑक्टोबर २०२१ रोजी लोकायत नागरी समितीचे कार्यकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी, कल्याणी दुर्गा रविंद्र, अशोक अलकुंटे, रोहित मदुरे आणि तक्रार असलेले स्थानिक नागरिक परिमंडळ क व ल च्या अधिकारी संगिता खोमणे यांना भेटले. सर्व लोकांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित अधिकार्यांरकडे जमा केली. लोकांनी त्यांच्या अडचणी अधिकार्यां समोर मांडल्या. यावेळी परिमंडळ क व ल च्या अधिकारी संगिता खोमणे म्हणाल्या की “आमच्याकडे २ परिमंडळांच्या कामांचा भार आहे आणि कामं करणारी लोकं कमी आहेत. तरी सर्व नागरिकांच्या अर्जांची व्यवस्थित शहानिशा करण्यात येईल. त्यानुसार पुढील आवश्यक ती पावलं उचलली जातील.”

लोकायत नागरी समितीच्या कार्यकर्त्या कल्याणी दुर्गा रविंद्र म्हणाल्या की “ रेशन हा लोकांना संविधानाने दिलेला अधिकार आहे. खरं तर उत्पन्नाची कुठलीही मर्यादा न ठेवता पूर्वीप्रमाणे लोकांना रेशन मिळालं पाहिजे. सध्याच्या वाढलेल्या महागाईत लोकांचं जगणं अवघड झालं आहे. अशावेळी लोकांना रेशनमध्ये धान्य मिळणं हा संसारासाठी मोठा हातभार आहे. आम्ही लोकायत नागरी समितीच्या वतीने लोकांना आपल्या हक्कांबद्दल जागृत करत आहोत.”
श्रीकृष्ण यांनी सांगितले की “वस्तीतील बहुतांशी लोकांना हे माहित नाही की रेशन बंद झाले तर कुठे जावे? रेशन चालू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? तक्रार कशी करावी? अशा अनेक बाबतींत जनतेला जागृत करणे आवश्यक आहे.त्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम करणे गरजेचे आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading