Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समीर वानखेडे यांचे आई-वडील हे सुद्धा मुस्लिमच – निकाह लावणाऱ्या मौलवीचा खळबळजनक दावा

मुंबई ; राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर रोज नवीन आरोप करताना दिसून येत आहे. मात्र वानखेडे यांच्यावर केलेल्या एका आरोपाच्या चर्चेने जोर धरला तो आरोप म्हणजे वानखेडे मुस्लीस असून त्यांचे खरे नाव समीर दाऊद वानखेडे या आरोपानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात आले आहेत. चुकीची कागदपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मात्र समीर यांनी मलिक यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा केला आहे. असे असताना समीर आणि शबाना यांचा निकाह करणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनी खळबळजनक दावा केला आहे.

मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये सांगितले की, मुलगा आणि मुलगी दोघेही मुस्लिम आहेत असे सांगितल्यावरच आम्ही त्यांचा निकाल लावला आहे. समीर यांचे आई-वडील हे सुद्धा मुस्लिमच होते. तेव्हा मुस्लिम असल्यावरच निकाह होतो. ऐवढच नाही तर समीर वानखेडे यांनी आपले नाव समीर दाऊद वानखेडे असे निकाहवेळी सांगितले होते. असा खळबळजनक दावा निकाह लावणाऱ्या मौलानानी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्याविषयी या चर्चेने जोर धरला आहे.

समीर वानखेडे यांचा २००६ रोजी शबाना यांच्याशी विवाह झाला होता. त्यांचा परस्पर संमतीने २०१६ मध्ये घटस्फोट झाला त्यानंतर त २०१७ मध्ये मध्ये समीर वानखेडे यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या विवाह केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading