पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव 

पुणे : ‘प्रकृती केअर फाउंडेशन’ च्या वतीने सामाजिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा  गुणगौरव सोहळा भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकृती केअर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

याप्रसंगी प्रकृती केअर फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शिवकन्या बारगजे उपस्थित होत्या. कार्यक्रमविषयी माहिती देताना डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी सांगितले की, या गुणगौरव सोहळ्याबरोबरच ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर’च्या हडपसर शाखेचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर असणार आहेत. तसेच भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रीय स्वयंंसेवक संघाचे पुणे शहर कार्यवाहक महेशजी कर्पे, येवले उद्योग समूहाचे संस्थापक नवनाथ येवले, डायना बायोटेकचे एमडी विनोद पाटील हे विशेष निमंत्रित आहेत.

याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त मछिंद्र चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त (सेवा निवृत्त) मिलिंद पाटील, ज्येष्ठ  नगरसेविका रंजनाताई टिळेकर, जनरल फिजिशियन डॉ. विजयकुमार भोर यांना विशेष सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असे डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी सांगितले.       

या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड प्राधिकरणचे सदाशिव खाडे, भाजप पुणे सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, माजी नगरसेवक रघूनंदन घुले, नगरसेवक आबा तुपे, कृषी उत्तपन्न बाजार समितीचे सभापती भूषण तुपे, नगरसेवक संजय घुले, नगरसेवक योगेश ससाणे, नगरसेवक विरसेन जगताप, नगरसेविका उज्वला जंगले, नगरसेविका वृषाली कामठे, नगरसेविका वैशाली बनकर, जनसेवा बँकेचे संचालक रवी तुपे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. दादा कोद्रे, सामाजिक कार्यकर्ते अशोकभाऊ मुंडे, सामाजिक कार्यकर्ते जीवन जाधव, भाजप हडपसर अध्यक्ष संदीप दळवी, सामाजिक कार्यकर्ते विकास रासकर, मांजरीचे सरपंच शिवराज घुले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  रविवार दि. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाजवळ, हडपसर, पुणे  येथे हा गुणगौरव सोहळा होणार असल्याचे  डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: