मुळशीत गांजा शेतीवर छापा; दोघांना अटक
पुणे : एकीकडे गांजावरून राज्यातील वातावरण तापलेले असताना दुसरीकडे आज पुणे शहर पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने मुळशीतील गांजा शेतीवर छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्यांच्या शेतावर गांजाचे उत्पादन करून त्याची विक्री केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या गांजाची एकूण 250 रोपे जप्त केली आहे. प्रकाश खेडेकर (वय ३५), इंदुबाई खेडेकर (वय ६५ , दोघे रा. गावळीवाडा, अंबरवेट, पौड, मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गांजा बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या चेतन मोहोळ व साहेबा म्हेत्रे या आरोपीं कडून संबंधीत गांजा विक्रेत्यांची माहिती मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता. आरोपी केवळ गांजाची विक्री करीत नाही तर गांजा शेती देखील करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी १८ किलो ९९५ ग्रॅम ओलसर हिरवा गांजा, 250 गांजाची रोपे असा एकूण 11 लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी पुणे शहर आमली पदार्थ विरोधी पथक १ व २ गुन्हे शाखेने केली आहे.
Maharashtra | Anti Narcotics Cell of Pune City Police has arrested two accused. The accused were involved in commercial selling of Ganja by producing it on their farm. A total of 250 trees/saplings of ganja worth Rs 11 lakhs recovered.
— ANI (@ANI) October 23, 2021
