देशातील, लसीकरणाचे श्रेय ‘जागरूक न्यायसंस्थेस’ हवे – गोपाळदादा तिवारी
पुणे : देशांतर्गत १०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पुर्ण झाल्याच्या ‘श्रेयाचे ढोल’ मोदी सरकार बडवत जरी असले, तरी वास्तवते कडे दुर्लक्ष करता येणार नसून, केंद्र सरकारच्या लसीकरणा धोरण विसंगती’वर मे ऊच्च व सर्वोच्च न्यायालयाने ‘वारंवार ताशेरे ओढूत’, केंद्र सरकारला ‘लसीकरणाची जबाबदारी’ राज्यांवर ढकलतां येणार नसल्याची जाणीव करून देत, लसीकरणाच्या निश्चित धोरणा बाबत मुदतीमध्यो ‘ॲफीडेव्हीट’ देखील सादर करण्याचे आदेश दिले होते व याचे स्मरण करून देण्याची वेळ आली असल्याचे, राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले…!
त्या नंतरच २१ जून नंतर १८ ते ४४ वर्षातील नागरीकांची केंद्राने लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली मात्र ‘सिंगल लसींचे’ दर २५० वरून, थेट ८००, १२०० व १५०० पर्यंत नेले…व नागरीकांवरच भुर्दंड टाकला… ‘मोफत लसीकरणा’चे (जाहीरातीं प्रमाणे) कमिटमेंट सरकारने पुर्ण करावे.. अन्यथा जाहीरात फलकांवर काळी निशाणें’ लावू असा ईशारा देखील राजीव गांधी स्मारक समिती सदस्यांनी ‘पुणे पत्रकार संघात’ पत्र-परीषद घेऊन दिल्याचे ‘स्मरण’ देखील करून देत असल्याचे समिती तर्फे सांगितले…
मागील वर्षी मे २०२० दरम्यान या घटना घडल्याचे देशवासीयांच्या स्मरणात असून, सर्वोच्च न्यायालयाने जून २०२० मध्ये ‘लसीकरणा बाबत’ मुदतीत ॲफीडेव्हीट सादर करण्यास सांगून देशवासियांना मोफत संसर्गजन्य लसी देण्याची जबाबदारी केंद्राचीच असून या पुर्वीच्या सरकारांनी ७० वर्षात ती वेळोवेळी कर्तव्यबूध्दीने पाळली असल्याचा ईतिहास आहे असे देखील गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे… ऊलट लसीकरणाचे दर देखील बदलले गेले तरी देखील विविध दरांत ‘नागरिकांनी व कार्पोरेट कंपन्यांनी’ लसी विकत घेऊन लसीकरण करून घेतले व याचे प्रमाण सु५०% पेक्षा कमी नाही ही देखील वास्तवता आहे…एकुण लसीकरणात सिरम च्या कोवीशील्ड चा वाटा सर्वाधीक ७५% पेक्षा जास्त असल्याची वास्तवता नजरेआड करता येण्यासारखी नसून ‘सिरम’ला अमेरीके कडे वारंवार कच्चा-माल (रॅा मटेरीयल) साठी “जाहीर आवाहने व याचना” करायला लागली होती… हे काम देखील केंद्र सरकारने केले नाही.. मात्र ‘लसीकरणाचे’ श्रेय घेण्यात व हजारो कोटींची जाहीरातबाजी करत मोदी सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे.. हे #श्रेयजीवी सरकार ला शोभत नाही अशी टिका करत अपयश झाकण्यासाठी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री मा हर्षवर्धन सह अनेकांना तडका फडकी का काढले(?) याचे काय ऊत्तर ही #भाषणजीवी व #श्रेयजीवी मोदी सरकारने द्यावे.. असेही गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे…!!!!
