Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

प्रसिद्ध नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांची प्रकट मुलखत व कथकनृत्य

पिंपरी : थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने रंगयात्री ( रसिककला सेतू ) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. करोनानंतर जवळजवळ दिड वर्षाने पुन्हा नाट्यगृह सुरु केले गेले. १५ दिवसांच्या महोत्सवात पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

महोत्सवाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड मनपाच्या महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रसिद्ध नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, साहित्यिक श्रीकांत चौगुले, आयोजक प्रभाकर पवार व अमृता पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांच्या गणेशवंदनेने झाली. यात भावना सामंत, अनुष्का सामंत, विद्या चौधरी आणि मोहिनी पाटिल यानी सहभाग घेतला. या नंतर मुलखतीचा कार्यक्रम सुरु झाला व त्यातून नंदकिशोर कपोते यांचा जीवनपट आपोआप उलगडत गेला.

डॉ. कपोते यांनी आपले बालपण, आपला नृत्यप्रवास, त्यांनी दिल्ली येथे पं.बिरजू महाराज यांच्याकडे गुरु – शिष्य परंपरेनुसार घेतलेले शिक्षण, पुणे व निगडी येथे विद्यार्थ्यांना कथक नृत्य शिकवताना आलेले अनुभव याचे मुलखतीद्वारे सविस्तर वर्णन केले. त्यांच्या शिष्या भावना सामंत, अनुष्का सामंत, श्रीनिधी जोशी आणि चेतना बडगुजर यांनी कथक नृत्यातील गतनिकास, तोडे, बाँट , इत्यादी प्रकार सादर केले. त्यास रसिकांनी भरभरुन दाद दिली. डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या रंगतदार मुलाखतीनंतर खास रसिक प्रेक्षकांच्या आग्रहाखातर स्वतः डॉ. कपोते यांनी कथक नृत्त्य सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रचंड टाळ्यांच्या गजरात रसिक प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले. कार्यक्रम एवढा सुंदर झाला की दोन तास कसे गेले हे कळलेच नाही. यातून त्यांचे कला क्षेत्रातील अनमोल कार्य, त्यांचे नृत्यातील योगदान याचा सविस्तर परिचय रसिकांना झाला. कार्यक्रमात तबला साथ यश त्रिशरन व हार्मोनियमवर अक्षय येंडे यांनी अप्रतिम साथ केली. डॉ. नंदकिशोर कपोते यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सुहास जोशी व प्रभाकर पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading