मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण; तरीही विनामास्कच
मुंबई : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेवून सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांच्यासह त्यांची आई व कर्मचारी देखील कोरोनाचीपॉझिटिव्ह आहेत. त्यांनी देखील कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेत. मुंबई महापालिकेने या माहितीला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे करोंना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयात जाताना राज ठाकरे हे विनामास्कच होते. अनेकदा सहकारी व प्रसारमाध्यमांकडून राज ठाकरे यांना मास्क लावण्याची आठवण करून देण्यात येत होती. मात्र त्यांनी कधीच मास्क लावलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना किरकोळ ताप सोडल्यास कोणतीही लक्षण नाहीत. ते व त्यांची आई दोघेही घरीच क्वारंटाईन असणार आहेत. तर कर्मचारी पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यामुळे आगामी महापालीका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा उद्या आणि परवा पुणे-मुंबईत होणारा कार्यकर्त्यांचा मेळावा काल पुढे ढकलण्याच आला आहे.
