Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRA

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मिळणार गुणपत्रिकेची प्रत

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी मिळणार आहे. एमपीएससच्यावतीने प्रथमच गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी देण्यात येणार आहे. या सोबतच गुणपत्रिकेची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर गुणपत्रिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दिनांक 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

अशी मिळवा गुणपत्रिका 

१) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे.

२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी.

३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे.

४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल.

गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading