fbpx

शंकर महादेवन यांनी ‘सूर्या’च्या नवीन कॅम्पेनच्या माध्यमातून दिला एकत्र येण्याचा संदेश

मुंबई : भारतात दिवे, पंखे, होम अप्लायन्सेस, स्टील पाइप्स आणि पीव्हीसी पाइप्ससाठीचा सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वसनीय ब्रॅंड सूर्या रोशनीने ‘सूर्या सबको मूड में ले आये’ या थीमवर आधारित एक नवीन अॅड कॅम्पेन आणले आहे. प्रसिद्ध भारतीय गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांना दर्शविणारे हे कॅम्पेन सूर्याच्या सध्या सुरू असलेल्या ब्रॅंड रिफ्रेशचा एक भाग आहे.

या अत्यंत व्यस्त आणि धकाधकीच्या जगात हे कॅम्पेन कुटुंबांना एकत्र येण्यासाठी आग्रह करते आणि एका आकर्षक गोष्टीतून आणि शंकर महादेवनच्या सुमधुर गीताच्या माध्यमातून सूर्याच्या महत्त्वाच्या कन्झ्युमर उत्पादनांची अनोखी फीचर्स आणि त्यांचे लाभ हायलाइट करते.

या कॅम्पेनमध्ये सूर्याचे स्मार्ट लाइटिंग आणि लो नॉइज मिक्सर ग्राइंडर्स अशा दोन टेलिव्हीजन जाहिरातींचा समावेश आहे. हे कॅम्पेन ऑक्टोबरमध्ये लॉन्च झाले असून टेलिव्हिजन, प्रिंट आणि डिजिटल मीडिया मंचांवर चालत राहील.

निरूपम सहाय ईडी आणि सीईओ, लाइटनिंग आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स, सूर्या रोशनी म्हणाले की, “सूर्यामध्ये आम्ही आमच्या उपभोक्त्यांना नेहमी सर्वात पुढे मानतो आणि आधुनिक आणि प्रगतीवादी उपभोक्त्याच्या आकांक्षा पूर्ण करणारी उत्पादने बनवतो. आमच्या नवीन अॅड कॅम्पेनसाठी शंकर महादेवनला घेणे या एक चांगला निर्णय होता, कारण त्याने आपल्या गाण्याने आणि अभिनय कौशल्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यात एका आधुनिक, इनोव्हेटिव्ह, प्रगतीवादी आणि स्टायलिश ब्रॅंड म्हणून स्वतःला सादर करण्याचे आमचे व्हिजन छान पकडले आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: