Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

बिबवेवाडी येथे गौरव घुले यांच्यामार्फत मोफत कोविड लसीकरण शिबिर

पुणे: महेश सोसायटी व चिंतामणी नगर परिसरातील जास्तीत जास्त लोकांना लसीकरणाचा लाभ घेता यावा. या उद्देशाने विजयादशमीच्या मुहूर्तावर बिबवेवाडीतिल युवा नेतृत्व गौरव घुले यांच्या मार्फत मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील  शिबीर महेश सोसायटी येथील महेश गोडाऊन जवळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ यावेळेत भरविण्यात आले होते. तज्ञ डॉक्टर, नर्सेस, उत्तम नियोजन यांमुळे शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळ जवळ २५० पेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केले. सणाचा दिवस असूनही पटकन लस मिळत असल्याने महिलांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती. गौरव घुले च्या मार्फत हा उपक्रम घेण्यात आला असून त्याअंतर्गत तेथे उपस्थित असलेले डॉक्टर्स,नर्सेस यांच्या कार्याला सलाम म्हणून यांचा सत्कारही करण्यात आला. विजयदशमीच्या मुहूर्तावर लोकांना चांगले आरोग्य लाभावे या निमित्ताने केलेला हा प्रयत्न. नागरिकांनी उत्तमप्रकारे सहकार्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading