Wednesday, July 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर “A फक्त तूच” मध्ये दिसणार  एकत्र!!

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहोचलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर “A फक्त तूच” या चित्रपटात एकत्र येत आहेत. एका वेगळ्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे करत आहेत. चित्रपटाची कथा त्यांचीच असून, प्रफुल एस. चरपे यांनी पटकथा, संवाद लेखन केलं आहे. राजू भोसले क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे कार्यकारी निर्माता आहेत तर रणजित माने यांनी छायांकन, सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी  निभावली आहे. चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर यांच्यासह या चित्रपटात माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बुरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम हे रंगभूषाकार म्हणून काम पाहणार आहेत.
समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात टीजर पोस्टरमध्ये दिसत आहे. तर कारण आपलं नातं वेगळं आहे… ही चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे एक वेगळी आणि रोमँटिक कथा चित्रपटातून पहायला मिळेल असा अंदाज टीजर पोस्टरवरून करता येतो. नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलेले चिन्मय उदगीरकर आणि सुरुची आडारकर ही फ्रेश जोडी चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading