अस्‍मीआभा: कला आणि संस्कृती यांचा सुरेख संगम

पुणे: भारतीय पारंपारिक पोशाखाला पुनर्परिभाषित करण्‍याच्‍या विचारसरणीसह स्‍थापना करण्‍यात आलेला ब्रॅण्‍ड अस्‍मीआभाचा देशभरातील अद्वितीय हस्‍तनिर्मित कलाकृतींना त्‍यांच्‍या पहिल्‍याच ब्रिक-अॅण्‍ड-मोर्टर स्‍टोअरमध्‍ये सादर करण्‍याचा मनसुबा आहे. स्‍टोअर कोरेगाव पार्क येथे १५ ऑक्‍टोबर रोजी भव्‍य उद्घाटनासह पुणे बाजारपेठेच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासोबत बाजारपेठेत उत्साह निर्माण करण्‍यास सज्‍ज आहे. प्रख्‍यात स्‍थळापासून आकर्षकरित्‍या डिझाइन केलेल्या आलिशान सोनेरी व काळ्या रंगातील स्‍टोअरसोबत त्‍यामधील वैशिष्‍ट्यपूर्ण ऑफरिंग्‍जपर्यंत ब्रॅण्‍डची स्‍थानिक स्‍तरावर तसेच क्षेत्रामध्‍ये देखील अद्वितीय उपस्थिती आहे.

अस्‍मीआभाचा लेहंगा, साड्या, सूट्स, डिझाइन दुपट्टा अशा त्‍यांच्‍या आकर्षक ऑफरिंग्‍जसह सर्व वयोगटातील ग्राहकांच्‍या व्‍यापक गरजांची पूर्तता करण्‍याचा मनसुबा आहे. ब्रॅण्‍डचा प्रत्‍येक विणकाम आणि निर्माण करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक कलाकृतीमधून प्रत्‍येक कारागीराच्‍या गाथेला प्रकाशझोतात आणण्‍यासाठी नवोन्‍मेष्‍कारी व अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाला एकीकृत करण्‍याचा दृष्टिकोन आहे.

एकूण बाजारपेठेतील पोकळी लक्षात घेत अजिंक्‍य गडेवार आणि वरद वट्टमवार यांनी त्‍यांच्‍या व्‍यावसायिक दृष्टिकोनासह भारतीय पारंपारिक पोशाखाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा त्‍यांचा प्रवास सुरू केला. १५० वर्षे जुना वडिलोपार्जित उद्यमाचा वारसा पुढे घेऊन जाण्‍याच्‍या दृष्टिकोनासह या दोघांनी अस्‍मीआभासाठी पाया रचला आहे. ब्रॅण्‍ड दोन सह-संस्‍थापंकांनी विविध वैशिष्‍ट्य स्‍थापित व सादर करत महिलांच्‍या भारतीय पारंपारिक पोशाख खरेदी करण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करण्‍यासाठी लाँच करण्‍यात आला आहे, यामधून ब्रॅण्‍डची खासियत व चमक दिसून येते.

ब्रॅण्‍डचे सह-संस्‍थापक अजिंक्‍य गडेवार म्‍हणाले,”बाजारपेठेतील विद्यमान पोकळी आणि अनपेक्षित महामारीच्‍या प्रादुर्भावामुळे ग्राहकांना विनासायास शॉपिंग अनुभव देण्‍याच्‍या खात्रीसाठी ब्रॅण्‍ड्सनी नवीन नवोन्‍मेष्‍कार सादर करणे अनिवार्य बनले आहे. स्‍मार्ट मिरर आणि इतर ऑफरिंग्‍जसह ग्राहक आता एकसंधी शॉपिंग अनुभवाचा आनंद घेऊ शकतात.”सध्‍या, अनपेक्षित प्रक्रियांच्‍या सादरीकरणासह अडथळ्यांवर मात करत तंत्रज्ञानाच्‍या वापराच्‍या माध्‍यमातून ही पोकळी भरून काढणे आवश्‍यक आहे.

अस्‍मीआभा स्‍मार्ट मिरर आणि प्राचीन काळांपासून प्रेरणा घेत सादर करण्‍यात आलेली ‘बैठकी’च्‍या प्राचीन परंपरेच्‍या माध्‍यमातून क्षेत्रातील इतर लेबल्‍सच्‍या तुलनेत अग्रस्‍थानी आहे. ब्रॅण्‍ड स्‍थानिक कारागीरांसोबत सहयोगाने काम करतो आणि नैतिकदृष्‍ट्या जबाबदार आहे. समाजाचे ऋण फेडणे हे सर्वश्रेष्‍ठ कार्य आहे.

ब्रॅण्‍डचे सह-संस्‍थापक वरद वट्टमवार म्‍हणाले,”अस्‍मीआभाच्‍या माध्‍यमातून आमचा भारतीय संस्‍कृतीचा अस्‍सलपणा जपण्‍याचा आणि देशभरातील स्‍थानिक विणकर व कारागीरांचा सन्‍मान करत त्‍यांना त्‍यांची कौशल्‍ये दाखवण्‍याकरिता व्‍यासपीठ निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न आहे.”

 

Leave a Reply

%d bloggers like this: