Wednesday, July 29, 2026
Latest NewsPUNE

कन्या पूजन आणि तृतीयपंथीयांचे पूजन हे ईश्वराचे पूजन – चंद्रकांत पाटील

पुणे : नवरात्रात अष्टमी हा फार महत्वाचा दिवस असून या दिवशी कन्या पूजन केले जाते. आज या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलींना मोफत ड्रेस तर तृतीयपंथीयांना साड्या भेट देऊन त्यांचे अनोखे पूजन केले जात आहे याचे समाधान वाटते असे भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका व ह्या नवरात्र उत्सवाच्या संयोजिका मंजुश्री खर्डेकर, उत्सव प्रमुख  श्वेताली भेलके, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, पुनीत जोशी, हर्षदा फरांदे,  बाळासाहेब टेमकर, सुरेखा जगताप, सुवर्णा काकडे, सचिन मोकाटे, जगन्नाथ कुलकर्णी, दिनेश माथवड, नवनाथ जाधव, प्रतीक खर्डेकर, मोहित भेलके व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुलींचे आणि तृतीयपंथीयांचे पूजन म्हणजेच परमेश्वराचे पूजन असे मी मानतो असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच तृतीयपंथीयांनी मांडलेल्या वेदना मी समजून घेतल्या असून शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देईन असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना सणा सूदीच्या काळात अनेक घरांमध्ये मुलींना नवीन कपडे शिवता आले नाहीत, त्यामुळे चंद्रकांतदादांनी ठरविले की गरजू मुलींना शिलाई सह ड्रेस द्यायचे व त्या माध्यमातून गत दीड वर्षाच्या काळातील त्यांच्या मनावरील मळभ दूर होऊन त्यांना प्रसन्न पणे नव्या उमेदीने न्यू नॉर्मल परिस्थितीत जगता येईल या हेतूने हा उपक्रम राबविला जात असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
तृतीयपंथी्यांसाठी काम करणाऱ्या *द मिस्ट* संस्थेच्या सोनाली दळवी यांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत मिळणारा आमच्या हक्काचा निधी मिळावा अशी मागणी मांडली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृतीयपंथीयांच्या लिंगबदल शस्त्रक्रिया ह्या रुग्णालयातील मोफत उपचारात समाविष्ट केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानताना ह्याचा लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.कोरोनाच्या संकटाचा विचार करून यावर्षी मंदिरातच देवीची प्रतिष्ठापना केली असून उत्सव ही सांस्कृतिक कार्यक्रमाविना साजरा करत असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. पुढील वर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात मुक्त वातावरणात साजरा करता यावा असे देवीला साकडे घातले असल्याचेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading