एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रमझान शेख, दशरथ साळवी यांचा मानांकित खेळाडूंवर विजय 

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए आयटीएफ वरिष्ठ एस100 टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रमझान शेख, दशरथ साळवी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला. 
 
डॉ.जी.ए. रानडे टेनिस सेंटर, मुंबई येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 35 वर्षांवरील पुरुष एकेरी गटात रमझान शेखने दुसऱ्या मानांकित रुपजीत भरालीचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. अव्वल मानांकित विशाल बद्री व चौथ्या मानांकित आकाश काळे यांनी दर्शन गुप्ता व रोहित साने यांचा 6-0, 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव केला.
 
45 वर्षांवरील गटात दशरथ साळवीने दुसऱ्या मानांकित बुलबुल दासचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित नितीन किर्तने याने संदीप भरुचाचे आव्हान 6-1,6-0 असे मोडीत काढले.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी: 35 वर्षांवरील एकेरी पुरुष गट:
विशाल बद्री(भारत)(1) वि.वि.दर्शन गुप्ता(भारत) 6-0, 6-0;
दत्ता रेवांत(भारत)(3) वि.वि.आशुतोष गोयल(भारत) 6-2, 6-0;
मुदीत खन्ना(भारत)वि.वि.देवाशिष नांदी(भारत) 6-2, 6-2;
आकाश काळे(भारत)(4) वि.वि.रोहित साने(भारत)6-0, 6-0;
रमझान शेख(भारत)वि.वि.रुपजीत भराली(भारत)(2) 6-0, 6-0;
आल्पेश गायकवाड(भारत)वि.वि.नितेश रुंगता(भारत)6-1, 6-3;
ऋषभ मेहता(भारत)वि.वि.हरेश रामचंदानी(भारत) 6-2, 6-0;

45 वर्षांवरील पुरुष गट: उपांत्यपूर्व फेरी:
नितीन किर्तने(भारत)(1) वि.वि.संदीप भरुचा(भारत) 6-1,6-0;
जिगर जेटली(भारत)(3) वि.वि.जितेंद्र शिंदे(भारत) 7-6(4), 6-3;
विनायक बेटगिरी(भारत)वि.वि.मंगेश दाभाडे(भारत) 6-2, 6-0;
दशरथ साळवी(भारत)वि.वि.बुलबुल दास(भारत)(2) 6-0, 6-0;

Leave a Reply

%d bloggers like this: