Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENTLatest News

लोकप्रिय नायिकांच्या मांदियाळीत रंगणार सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या नवरात्री विशेष भाग

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला. या आठवड्यात नवरात्रीचा उत्साह कायम ठेवत सर्व स्पर्धक देवीला समर्पित करणारी गाणी सादर करणार आहेत आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी मंचावर सज्ज होणार आहेत झी मराठीच्या लाडक्या मालिकांमधील प्रमुख नायिका.
प्रार्थना बेहेरे, अन्विता फलटणकर, ऋता दुर्गुळे, श्वेता राजन, कुंजिका काळविण्ट, तन्वी कुलकर्णी, वैष्णवी करमरकर या प्रेक्षकांच्या आवडत्या नायिकांसोबतच महाराष्ट्राची महानायिका अलका कुबल आणि प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे देखील या विशेष भागात सहभागी होणार आहेत. या सर्व नायिकांच्या उपस्थितीत सगळे लिटिल चॅम्प्स खूप धमाल करणार आहेत. त्यांच्या गाण्यांमुळे या नायिकांनी मंचावर ताल देखील धरला आणि काही गाणी त्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेली. या विशेष भागात परफॉर्मर ऑफ द वीक कोण ठरेल? गोल्डन तिकीट कोणाला मिळेल? आणि या मंचावरील कुठल्या स्पर्धकांचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading