आजच्या नवदुर्गा स्त्रिया म्हणजे स्त्रियांची निर्णयक्षमता आत्मविश्वास आणि त्यांचे कर्तृत्व – वीणा गोखले

पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी पुणे जिल्हा वतीने नवदुर्गा सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी”देणे समाजाचे” या उपक्रमाच्या सर्वोसर्वा वीणा गोखले या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंदजी कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा केतकी कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी सीमा रानडे यांनी देवीवंदना सादर केले. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाची माहिती सांगितली तसेच महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमात सभासद नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला असे जाहिर करत नोंदणी कशी असेल त्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य कसे अपेक्षित आहे हे सांगितले.  नंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लीना कुलकर्णी, लीनाताई दबडघाव, स्मिता कुलकर्णी, रंजना करंदीकर, शीला डावरे, दिपा जोशी ‌, डॉ. श्रद्धा कुलकर्णी, आदिती अक्कलकोटकर, शुभदा धालेवाडीकर, या आपापल्या क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला. तसेच या नवदुर्गांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वीणा गोखले यांनी आपल्या भाषणातून स्त्रियांची निर्णयक्षमता आत्मविश्वास आणि त्यांचे कर्तृत्व व अनेक उदाहरणे देऊन नामनिर्देशित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतपाल मा. डॉ.प्रविणजी दबडघाव यांची विशेष उपस्थिती होती . या कार्यक्रमात सुनिल शिरगावकर, राहुल जोशी, दिपिका बापट, विवेक व मंजुषा खिरवडकर, विकास व शिवानी अभ्यंकर शिल्पा व‌ दिपक महाजनी मुग्धा व मनिष जोशी,, अजित खरे, जयश्री घाटे, भारती भोपळे, कुंदा बिडकर, आकांक्षा देशपांडे, स्मिता बुचके, अतुल कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, पंकज पतके, रोहिणी ढाले, अनिता काळे, शुभाली कुलकर्णी, सोनाली परचुरे, रेणुका बापट, शैला सोमण, अनघा पराई  मृणालिनी फुलगिरकर ऋषिकेश गोरे, अनिरुद्ध व चैत्राली पळशीकर, श्रीकांत देशपांडे पल्लवी गाडगीळ, डॉ. अर्चना जोशी, शेखर देशपांडे आणि महासंघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: