नॉइजने तापसी पन्नूसह नवी मोहीम सादर केली

पुणे : नॉइज या भारतीय कनेक्टेड लाईफस्टाइल ब्रँडने लिसन टू द नॉइज विथीन ही आपली नवी मोहीम सादर केली असून त्यात नावाजलेली अभिनेत्री आणि सेलिब्रेटी तापसी पन्नू सहभागी झाली आहे. नॉइजने नुकतीच तापसी पन्नूची वेयरेबल्स विभागाच्या ब्रँड अम्बेसिडरपदी नेमणूक केली आहे. यासह ब्रँडने नॉइजमेकर्सना अर्थात आवाज उठवणाऱ्यांना कधीच आशा न सोडण्यासाठी आणि आपला आतला आवाज ऐकताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे. या डिजिटल कॅम्पेनचा एक भाग म्हणून नॉइजने एक महत्त्वाकांक्षी व्हिडिओ तयार केला असून तो नॉइजच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर पाहाता येईल. हे कॅम्पेन आजच्या तरुणांना स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी, इतरांची मतं व बाहेरच्या ‘आवाजाखाली’ न दबण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने तयार करण्यात आले आहे.

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या १० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तापसीची प्रेरणादायी गोष्ट पाहायला मिळते. कशाप्रकारे तिने आतला आवाज ऐकत संघर्षावर मात केली आणि स्वतंत्र अभिनेत्री म्हणून ओळख प्रस्थापित केली हे दाखवण्यात आले आहे. या अभिनेत्रीने कायमच फिटनेसला प्राधान्य दिले असून त्यातून तयार झालेले तिचे नवे रूप नॉइजच्या स्मार्टवॉचसह पाहायला मिळते. तापसी तिचा दमदार अभिनय आणि सशक्त भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. तिचे यश आव्हानांवर विजय मिळवण्याच्या तिच्या जिद्दीची साक्ष देणारे आहे.

या कॅम्पेनविषयी नॉइजचे सह- संस्थापक अमित खत्री म्हणाले की तापसी पन्नू यांच्यासह आमचे पहिले कॅम्पेन लाँच करताना अतिशय आनंद होत आहे. तापसी यांचे व्यक्तिमत्त्व दयाळू, उत्साही आणि तितकेच आक्रमक आहे, जे नॉइजच्या तत्वांशी सुसंगत आहे. गुदमरून टाकणाऱ्या आवाजांवर आणि आव्हानांवर मात करून अधिक चांगली कामगिरी करण्याच्या बाबतीतली आमची तत्वे समान आहेत. कॅम्पेनमधील तापसी यांच्या सहभागातून अशा नॉइजमेकर्सना आम्ही सांगू इच्छितो, की तुमच्याभोवती द्वेष करणारे कितीही आवाज असले, तरी तुम्ही आपला आतला आवाज ऐकलात आणि आपल्या मनाप्रमाणे वागलात तर अडथळे तुम्हाला थांबवू शकणार नाहीत. आम्ही आणि तापसीनेही कायमच ‘दिल का शोर’ ऐकण्याला महत्त्व दिलं आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: