एलजी आणि हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीचा खेड तालुक्यात १२ कुटुंबाना घरवाटप उपक्रम
पुणे : अपुर्या आणि निकृष्ट गुणवत्तेची घरे असलेल्या कुटुंबांसाठी कोव्हिड-१९ ही अत्यंत भयावह परिस्थिती होती. दुरावस्थेत राहणार्या लोकांसाठी घरी आसरा घेणे असुरक्षित किंवा अगदी अशक्य देखील होते. सुरक्षित आणि नीटनेटके घर हे कोरोनाव्हायरसविरूद्ध सुरक्षेसाठी एक उत्कृष्ट ढाल ठरू शकते.
हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया ही गृहनिर्माणाची ना–नफा संस्था निम्न-मिळकत गटातील कुटुंबांसाठी घरे बांधण्यात व सुधारित स्वच्छतेच्या सुविधा प्रदान करण्यामध्ये मदत करते, ज्यासाठी त्यांनी एलजी इलेक्ट्रॉनिक्स सोबत पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील खारोशी गावामध्ये सामाजिक विकास उपक्रमासाठी भागीदारी केली आहे. २८ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यामध्ये १२ कुटुंबांना नवीन कायमस्वरूपी घरे देण्यात आली. सात लाभार्थी महिला आहेत, ज्यांचे यजमान हयात नाहीत आणि चार लाभार्थी दिव्यांग वर्गातील आहेत. घरामध्ये एक बाहेरची खोली, एक बेडरूम आणि एक स्वयंपाकगृह व सोलार प्रकाशयोजना दिल्या आहेत. याचबरोबर, वैयक्तिकरित्या २५ कुटुंबांना घरगुती शौचालये देखील देण्यात आली.
“लाईफ इज गुड – होप व्हिलेज” शीर्षक असलेला प्रकल्प गावांचा सकारात्मकरित्या विकास करण्याच्या ध्येयाने आखला आहे आणि खारोशीतील रहिवाशांसाठी सोलार पथदिवे देखील लावून देण्यात आले आहेत. घरांचे बांधकाम करण्यासोबतच गावातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांना फ्रिज, वॉशिंग मशिन्स आणि वॉटर प्युरिफायर्स सारख्या नियमित वापराच्या वस्तू देखील देणगी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. गावातील शैक्षणिक संस्थेला देखील नव्याने रंगवण्यात आले आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे कार्यकारी संचालक यंग लॅक किम म्हणाले की आज ग्रामस्थांना घरे सुपूर्द केली गेल्यामुळे आमच्यासाठी आजचा दिवस अभिमानाचा दिवस आहे. आम्ही सर्वांचे आयुष्य चांगले करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि एलजी होप व्हिलेज हे या ध्येयाचे एक विस्तृत स्वरूप आहे. या सहाय्यासह केवळ १२ कुटुंबेच नव्हे तर संपूर्ण गाव सक्षम झाले आहे.
हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजन सॅम्युअल म्हणाले की राहण्यासाठी छानशी जागा असल्याची खात्री असल्यामुळे कुटुंब सुरक्षित आणि संरक्षित असल्याची खात्री राहते, केवळ वारा–पावसासारख्या नैसर्गिक शक्तींपासून नव्हे तर रोग आणि महामारींपासून देखील. या प्रकल्पाबाबत आम्ही एलजीचे आभार मानू इच्छितो एकत्रित प्रयत्नांतून आम्ही गावाचा सकारात्मक दृष्टीने विकास करू शकलो आहोत, ज्यामुळे कुटुंबांकडे राहण्यासाठी सुरक्षित निवारा निर्माण झाला आहे.
