Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

मार्केटयार्ड परिसरातील अवैध धंद्यावर कारवाईची मागणी

पुणे : मार्केटयार्ड परिसरातील चालू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करावी म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भारिप बहुजन महासंघ पुणे शहरचे उपाध्यक्ष भरत शिंदे यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हंटले आहे की वेळोवेळी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना वेळोवेळी मार्केटयार्ड परिसरामध्ये चालू असलेल्या अवैध सोरट, लॉटरी, मसाज पार्लर यांच्यावर कारवाई करण्यात यावी मात्र त्यांनी देखल घेतली नाही.
भारिप बहुजन महासंघ पुणे शहरचे उपाध्यक्ष भरत शिंदे यांनी पुणे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की मार्केट यार्ड पोलीस स्टेशन हद्दीत असणारे संपूर्ण गैरकायदेशीर अवैध धंदे हे फक्त मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे फक्त यांच्या संमती व आशीर्वादाने आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांच्यावर कारवाई झाली नाहीतर भविष्यात मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading