Sunday, August 2, 2026
Latest NewsPUNE

सत्ताधारी भाजप महापालिका विकायला काढतील अशी शंका मला वाटते; दिपक मानकर यांचे प्रतिपादन

पुणे : दिवसेंदिवस महिलांवर होत असलेले अत्याचार, शारिरीक, मानसिक, शाब्दीक छळ महाराष्ट्राच्या संस्कृती आणि संस्कारावर घात करण्यात कारणीभूत होत आहे. आणि या घटनेचा आधार घेऊन राजकारण करण्याची नीती सरासर चुकीची आहे. महिला अत्याचाराच्या नावाखाली राजकारण करने एक प्रकारे त्या पीडित बहीणीचा अपमान करताय याच भान त्या लोकांनी ठेवावे. खरच त्या महिलेची काळजी असेल तर तीला आधार, सांत्वन व पाहिजे ती मदत द्या पण राजकारण करणे सोडा. अशा भावना मंडई विद्यापीठ कट्टावर आज उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कट्टा हा पुणे सांस्कृतिचा एक भाग आहे. बाळासाहेब मालुसरे यांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून मंडई विद्यापीठ कट्टा चालतो. आजतागायत विविध क्षेत्रातील अडीच हजारहून अधिक मान्यवरांनी या कट्टावर आपले विचार मांडले आहेत. आज देखील मंडई विद्यापीठ कट्टावर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, पुणे शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुणे मनपाचे माजी उपमहापौर, नगरसेवक दिपकभाऊ मानकर, दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब भोसले, दत्ता सागरे, आप्पा जाधव, इलियाज भाई, हर्षद मालुसरे आदी आमंत्रीत होते. वतिने मालुसरे यांनी उपस्थितांचा सत्कार केला.

दीपक मानकर म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्या या पाच वर्षांत पुणेकरांना दिसेल असे कुठल काम शहरात झाले नाही. जागोजागी खड्डे करून ठेवल्याने वाहतूक व्यवस्था ढासळली आणि अपघातीचे प्रमाण वाढले आहे. सद्या महानगरपालिकेचा करभार पाहता सत्ताधारी महानगरपालिका विकायला काढतील अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्ताला वाटते. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुक मी लढवणार नाही असेही मानकर या वेळी म्हणाले.

बापूसाहेब भोसले म्हणाले, मी एक चळवळीचा चा कार्यकर्ता आहे. निवडणूका लावण्यापेक्षा आम्ही समाजातील नागरिकांना न्याय, हक्क देण्यासाठी काम करत असतो. कोरोना प्रादुर्भावामुळे दलित समाजातील अनेक नागरिकांना कष्टाचे दिवस वाढावे लागले. शक्य ती मदत संघटनेच्या माध्यमातून केली यांच समाधान देखील आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading