Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजित पवार ऐकत नसतिल तर त्याना सांगावे लागेल; खासदार संजय राऊतांचा राष्ट्रवादीला इशारा

पुणे : ‘राज्यात आपली सत्ता आहे. पण आपल इथे कोणी ऐकत नसेल तर त्याना सांगावे लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज? पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेतायेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचे आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल’, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, भोसरी विधानसभेत शिवसेनेचा एक ही नगरसेवक निवडून आला नाही, ही मोठी खंत आहे. येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. राज्यात महाविकासआघाडी आहे, मग महापौर पदाची आपण ईच्छा व्यक्त केली, तर त्यात काय चुकल. आता संवाद साधू, आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू.

अंगावर येऊ नका; चंद्रकांत पाटलांना इशारा 

संजय राऊत म्हणाले, मुंबईत जर आपला बोलबाला आहे पण त्या लगतच्या पुणे-पिंपरीत का होत नाही. ही खंत आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात येऊन घासून आले, मग आपण ठासून येऊ. कोल्हापूरचा गडी पुण्यात आला कींवा  कोथरूडमध्ये आला आपल्याला काही फरक पडत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका, असा इशारा त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.

संजय राऊत म्हणाले,  बाळासाहेबांनी आपल्याला सगळ्या पदांची जबाबदारी दिली. मंचावर बसलेल्या प्रत्येकाला पदं मिळाली आहेत, पण समोर बसलेल्यांना एक ही पद नाही मिळत, ते आहेत म्हणून आपण आहोत. मी दिल्लीतला पत्ता काय सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर संजय राऊत राहतो. ही देण बाळासाहेबांची आहे. मला म्हणून तर दिल्लीत खूप ओळखतात. आता हेच मोदी साहेबांना विचारलं तर कदाचित ते म्हणतील मी खासदार संजय राऊतांच्या समोर राहतो, असे मिश्किलपणे राऊत म्हणाले.

 

Leave a Reply