Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRA

जनशक्ती शेतकरी संघटनेचा आता सातारा जिल्ह्यात विस्तार होणार

सातारा : ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक ठेकेदार व सर्वसामान्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर, सांगली,कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आंदोलने करण्यासाठी सुपरिचित असणारी जनशक्ती शेतकरी संघटना आता सातारा जिल्ह्यातील पाय रोवणार असून संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे – पाटील यांनी नुकतीच सातारा येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी व कामगार यांचे प्रतिनिधी तसेच महिला कार्यकर्त्यांशी चर्चा केली, तसेच जनशक्ती संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे -पाटील यांच्या उपस्थितीत सातारा येथे झालेल्या सहविचार सभेत जनशक्ती संघटनेच्या पुढील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या खालीलप्रमाणे : महीला आघाडी सातारा जिल्हाप्रमुख –  शारदा भस्मे, माण तालुका प्रमुख – राजू मुळीक, म्हसवड विभाग प्रमुख भाऊसाहेब माने, महीला आघाडी खटाव तालुका प्रमुख -सपना रजपूत, महीला आघाडी सातारा तालुका प्रमुख- विद्या चव्हाण.

या सहविचार सभेस निर्मला काटकर, सविता शिंदे, स्वाती शेंडगे, अरूणा लोखंडे, अंकुश ऊपाळे, रोहन नाईकनवरे, आमोल कांबळे आदींची उपस्थिती होती.
शेतकरी कामगार वाहतूकदार व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आजवर जनशक्ती संघटनेने राज्यात ठिकठिकाणी संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे – पाटील यांच्या नेतृत्वा खाली विविध कल्पक आणि वैशिष्ट्यपूर्ण आंदोलने केली आहेत त्यामध्ये मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन, सीना- कोळेगाव धरणात स्थानिकांना मच्छीमारीसाठी परवानगी मिळावी यासाठी संबंधित कार्यालयात अर्धनग्न ठिय्या आंदोलन आधी माध्यमातून जनता- जनार्दनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित संघटना क्रांतीची भूमी असणाऱ्या सातारा जिल्ह्यात विस्तारित होत असल्याने अनेक जाणकारांनी समाधान व्यक्त केले आहे

शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नाविषयी अनेक संघटनांचा उदय झाला कालानुरूप त्या संघटना दिसेनाशा झाल्या मात्र सोलापूर जिल्ह्याच्या रणांगणावर उदयास आलेली जनशक्ती शेतकरी संघटना सध्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कष्टकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडताना दिसत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading